मनाचिये गुंती…

विचारांची प्रगती मनाच्या अनेक वर्षांच्या धावपळीचं फळ आहे. मनाचा हा अनेक वर्षांचा काळ वेगवेगळ्या नावांनी लिहीण्याचा हा एक बाळबोध प्रयत्न आहे. कधी मन प्रवासवर्णन या शब्दसमुहातून व्यक्त होईल तर कधी एखाद्या रागाच्या वर्णनानी ते मांडलं जाईल.या सगळ्यात एक गोष्ट सांगाविशी वाटत्ये ती म्हणजे यात कुठेही शब्दांचे मनोरे दिसणार नाहीत किंवा रसाळ विवेचन वगैरे गोष्टी शोधूनही सापडणार नाहीत.ज्यांना ‘भाषा’ या माध्यमासाठी हे वाचायचं असेल त्यांना विनंती आहे हे लिखाण तुमच्यासाठी नाही.यात फक्त मनाला मांडण्याचा प्रयत्न केला आहे जे फक्त अनुभवांच्या माध्यमातून शक्य झालंय. या काही थोड्या प्रवासात जे जे अनुभव आले आणि ज्यानी माझ्या मनाला म्हणजेच विचारांना बदललं ते जसं घडलं तसं आणि तितक्याच प्रमाणात सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.