आजी…

शरीर टिकवण्याची खटपट केली जाते कारण आपण आपले भोग याच माध्यमातून भोगत असतो. कितीही हाल होत असले तरी शरीर तोपर्यंत आपल्याशी नातं तोडत नाही जोवर तसं नातं टिकवण्याची आपण काही सोय मागील जन्मात करून ठेवली आहे. आपलंच शरीर आपल्याशी वाईट वागायला लागतं तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही हेच ते दुःख.
हे शरीर जन्माला आल्यापासून किती आणि कसं जगलं आहे कोणत्या वातावरणात वावरलं आहे हे सगळे कल्पना विलास संपले की बाकी असते ती फक्त त्या शरीराची आणि त्यातल्या खोट्या खोट्या जीवाची नाट्यमय ताटातूट.
जसं झोपेत होतं………अगदी तसंच.
शरीर जीर्ण झालं, आता जगून तरी काय फायदा आहे, वाचवायचे प्रयत्न, होणारे त्रास,हाल,तगमग हे सुरू असताना एका नवीन शरीराचा शोध घेण्याची तयारी सुरू असते…………परत एका पर्वाच्या सुरवातीसाठी……..परत एका नव्या कल्पना विलासासाठी…………….परत एका स्वप्नासाठी……….श्री राम……….

ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥