शरीर आणि एक दुर्लक्षित भ्रम

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शरीराबद्दल आपल्याला इतकं प्रेम इतका लगाव कसा काय तयार होतो ?त्यामागे काय कारण आहे?
इतक्या भ्रामक आणि खोट्या कल्पनेला आपण अनन्यसाधारण महत्व देऊन संपूर्ण आयुष्य घालवतो ही जादू कशी काय घडते हे कोडं परवा पडलं त्याचं कारणही अगदी विचित्र आहे.
गाडीच्या आरशात माझा चेहरा बघून एक विचार उमटला की आपण आपल्याला कधी बघू शकतो?
मग हाच विचार घोळत राहिला आणि
नंतर लक्षात आलं आपण उभ्या आयुष्यात आपल्याला कधीही पाहू शकत नाही………………………………..
तशी अतिशय सामान्य वाटणारी गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नव्हती.
आपण फक्त आपली प्रतिमा बघू शकतो पण जसं आपल्याला इतर प्राणी,माणसं दिसतात तसं आपण आपल्यालाही कधीही पाहू शकत नाही.
का आहे अशी विचित्र यंत्रणा?

ज्याला आपण माझं शरीर म्हणत असतो ते आपण कधीही बाहेरून पाहू शकत नाही ही मला तरी विचार करण्यासारखी गोष्ट वाटली.

आपण पाठ पाहू शकत नाही,डोकं नाही,डोळे नाही,कान नाक काहीच नाही.

आपल्या डोळ्यांना जे दिसतं तेच फक्त आपण पाहू शकतो मग असं नसतं करता आलं का की आपल्याला निदान आपण तरी पूर्ण दिसू ?
इतकं कठीण होतं का हे निर्मात्यासाठी ?

ही यंत्रणा मला समजू शकली नाहीये आणि याचं उत्तर बहूतेक विज्ञान देऊच शकणार नाही.
आपण आपल्याला का पाहू शकत नाही?
है कोई जवाब?

असेल तर नक्की कळवा…………