एखादी व्यक्ती गेल्यावर वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपापल्या कुवतीनुसार येत असतात.व्यक्ती कशी जाते, तिच्या आजुबाजूची परिस्थिती यावर त्या बऱ्यापैकी अवलंबून असतात.
व्यक्ती गेली म्हणजे जीव गेला.एका सेकंदात श्वासाची जागा रिकाम्या सेकंदानी घेतली आणि शरीराचा त्याग झाला. ‘कारण’ हे त्या शरीराच्या हातात नसतं ते फक्त आपल्याच आधीच्या अशाच एका अब्जावधी शरीरांमधल्या क्रियांचा एक भाग म्हणून आपल्या समोर वेगवेगळ्या मार्गांनी समोर येतं इतकंच.कोणी आत्महत्येनी मरतं,कोणी कॅन्सर नी.कोणी शरीर पुर्ण झिजवून ते सोडतं.
जीव जाणे ही क्रिया शाश्वत आहे.शरीराचा त्याग करणे ही क्रियाही काही अंशी प्रत्येकाच्या वाट्याला आहेच.झाडाचं पान फांदीपासून वेगळं होऊन जमिनीवर आदळलं की झाडाचाही तितका जीव जातो. एखादी व्यक्ती, एखादी मुंगी, एखादं झाड, मरणं हे आपलं मरण असतं. त्या प्रमाणात. समाजमान्यता, एकंदरीत मोरॅलिटी इ. गोष्टींचा विचार मनात येऊन आपण एखादं मरण चांगलं वाईट ठरवत असतो जे नैसर्गिक आहेच पण एखादं मरण आपलाही एक भाग आपल्या नकळत हिरावून नेत असतं हेही नैसर्गिक आहे. हत्तीण काय किंवा माणूस काय, आपलेच इतर शरीरातले अंश. नाव वेगळं, रूप वेगळं.
जग मनातून जन्माला येतं,पर्यायाने व्यक्ती,इतर जीवांची शरीरं……………………..अगदी मिळाल्यापासूनच नष्ट होण्याची व्यवस्था असणारे विचार.
नांदतो केवळ पांडुरंग.